Breaking News

वारसा लाभलेला आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे : डॉ. मालपाणी


संगमनेर/प्रतिनिधी :- शिक्षणाचे बीज हे लहान वयातच पेरले जाते. ज्ञान मिळवणे हा विद्यार्थी जीवनाचा प्राथमिक हेतु असावा आणि परीक्षा दुय्यम स्तरावर, असा वारसा लाभलेला आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संगमनेर महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'टिचींग रिसर्च ऍण्ड इनोव्हेटीव्ह ऍप्रोचेस् इन लाईफ सायन्स' या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उदघाटनप्रसंगी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्राईल येथील आय. एफ. जी. ओ. केंद्राचे संचालक प्रो. डॉ. तेत्सुजन बेनी रॉन तसेच रुहाणा विद्यापीठ, श्रीलंका येथील डॉ. डब्ल्यू. एच. ए. पी. गुरुगे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील डॉ. जी. डी. खेडकर, मंगलोर येथील ज्येष्ठ शिक्षक डॉ. भारती प्रकाश, प्राचार्य डॉ. के. के. देशमुख, उपप्राचार्य व चर्चासत्र समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. वंदना भवरे व कार्यक्रम समन्वयक डॉ. रुपेंद्र भागडे आदी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रासाठी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, श्रीलंका तसेच संपूर्ण भारतातील विविध प्रातांतून संशोधक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या परिचय व स्वागत उपप्राचार्य प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राणीशास्त्र विभाग व वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी मोलाचे परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. डॉ. रुपेंद्र भागडे यांनी आभार मानले.