कर्जत तालुक्यातील कुळधरण ग्रामविकास संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय वक्तृत्व, विविध गुणदर्शन, चित्र रंगवा स्पर्धा, मोफत काँम्प्युटराईज्ड नेत्रतपासणी, आदर्श पुरस्कार वितरण व भूमिपुत्रांचा सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दै. लोकमंथनचे संपादक अशोक सोनवणे यांच्या हस्ते दु. 1 वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कर्जतचे प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. कुळधरणच्या मंजुषा लॉन्स येथे होत असलेल्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र युवक क्रांती दलाचे उपाध्यक्ष व जेष्ठ विचारवंत अन्वर राजन हे प्रमुख वक्ते असणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश यादव, तहसीलदार किरण सावंत, गटविकास अधिकारी दत्तात्रय दराडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, प्राचार्य चंद्रकांत मोरे, युक्रांदचे सहकार्यवाह आप्पा अनारसे, प्राचार्य श्रावण गिरी आदी अधिकारी, पदाधिकारी, पत्रकार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासुन संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबविला जात असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
शिवजयंतीनिमित्त कुळधरणला तालुकास्तरीय स्पर्धा, आदर्श पुरस्कार वितरण ; भूमिपुत्रांचा सन्मान
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:04
Rating: 5