Breaking News

लोणार तहसील महाराष्ट्रात उत्कृष्ठ शासनाने तहसीलदार सुरेश कव्हळे यांचे केले अभिनंदन


लोणार तालुका प्रतिनिधी :  आपल्या विविध लोकोपयोगी उपक्रमा मुळे जनतेच्या व शासनाच्या पसंतीस उतरलेले लोणारचे तहसीलदार श्री सुरेश कव्हळे यांच्या कार्याची नुकतीच शासन दरबारी दखल घेण्यात येउन त्याचे विशेष कौतुक व अभिनंदन राज्य शासनाने केले आहे . शासनाच्या महसूल विभागा अंतर्गत प्रत्येक तालुका तहसील कार्यालचे मुल्यमापन करण्यासाठी एक समिती स्थापन करन्यात आली आहे ,या समितीने राज्यातील सर्व तहसील कार्यालयाचे निरीक्षण केले या निरीक्षणात लोणार तहसीलचा कारभार आनि दस्तऐवज यांचा रखरखाव तसेच तहसील परिसरातील वृक्षसंवर्धन आणि कार्यालयाच्या आतमध्ये असनारे विविध फुलझाडे यामुळे या कार्यालयला छान कार्पोरेट लुक आलेला आहे तसेच महाराजस्व अभियानात विविध जनकल्याणकारि योजना जनते पर्यंत पोहचविण्यासाठी तयार केलेली चित्रप्रदर्शनि बोलक्या भिंती च्या रूपाने सर्वसामान्य लोकांच्या अवलोकनार्थ तयार करण्यात आलि आहे. गतिमान प्रशासन कसे कार्य करते याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अत्याधुनिकरन कर आले आहे विविध अर्थसाहाय्य योजनाचे धनादेश थेट लाभार्थीच्या घरि स्वता: तहसीलदार सुरेश कव्हळे घेऊन जातात तेव्हा जनतेच्या मनात त्यांच्या विषयि आदर द्विगुणीत होतो, लोणार महोत्सव खर्‍याअर्थाने लोकोत्सव करण्याचे श्रेय सुध्दा कव्ह्ळे याना जाते , त्यांच्या या कार्य प्रणालीचे रोड्मॅप राज्यातील सर्व तहसिल कार्यालयांसाठी मार्गदर्शक असल्याने त्याचे विशेष कौतुक राज्याचे महसूल सचिव माधव विर यांनी महसूल आयुक्त पियुष गोयल यांच्या व जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्या माध्यमातून पत्राद्वारे केले आहे . सदर पत्रात पुढे नमुद केले आहे कि तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या कार्यशैलीचा वापर राज्यातील सर्व तहसीलदारानि करवा जेणेकरून जनतेला गतिमान आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासकीय सेवेचा लाभ मिळेल . निश्‍चितच आपल्या आगळया वेगवेगळ्या कार्यशैलीमुळे तहसिलदार सुरेश कव्ह्ळे महसूल विभागासाठी रोडमॉडेल ठरले असुन हि बाब लोणार तालुक्यासाठी सुध्दा भूषणावह आहे एव्हढे मात्र निश्‍चित !!!!!