सिंधुदुर्ग, - मालवण तालुक्यात रेवंडी येथील भद्रकाली देवी मंदिर समोरील खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून खाडीपात्रातच बंधकाम करण्यात आले असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमी महेश जुवाटकर यांनी महसूल खात्याकडे केली. तक्रारीनंतर महसूल खात्याकडून याबाबत कारवाईस सुरुवात.रेवंडी येथील भद्रकाली मंदिर समोरच्या खाडीपात्रातली कांदळवनाची झाडे तोडून बांधकाम करण्यात आले असून ही बाब पर्यावरण प्रेमी महेश जुवाटकर यांनी जिल्हाधिकारी उदय चौधरी व तहसीलदार समीर घारे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तहसीलदार समीर घारे यांनी आचरा मंडल अधिकारी एम. पी. पारकर यांना तत्काळ घटनास्थळी जाऊ न पाहणी करून पंच यादी घालण्याचे आदेश दिले.
रेवंडी खाडीपात्रात कांदळवनाची तोड करून बांधकाम
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:11
Rating: 5