Breaking News

सांगलीत कृष्णा नदीपात्रात आढळला मृत माशांचा खच

सांगली,- वाढलेल्या प्रदूषणामुळे कृष्णा नदीपात्रात रविवारी सकाळी हजारो मासे मृतावस्थेत तरंगत असल्याचे आढळून आले. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मिसळत असलेल्या शेरीनाला व ड्रेनेजच्या दूषित पाण्यामुळे हे मासे मृत झाल्याची चर्चा आहे. या प्रकाराने नदीकाठावरील गावांसह सांगलीकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न किती गंभीर आहे, हे सामोरे आले.


रविवारी सकाळी नदीकाठी गेलेल्या अनेकांना नदीपात्रात हजारो मासे मृतावस्थेत तरंगत असल्याचे निदर्शनास आले. संबंधितांनी ही माहिती तात्काळ प्राणीमित्र व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडील अधिका-यांना कळवली. मात्र संपूर्ण दिवसभरात पाणीपुरवठा विभाग अथवा महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडील एकही अधिकारी नदीपात्राकडे फिरकला नाही.