Breaking News

जडीबूटी औषधे विकणारी तरुणी बेपत्ता


शिर्डी शहरालगत असलेल्या सावळीविहीर फाटा येथे रस्त्याच्या कडेला जडीबूटी औषधे विकून गुजराण करणारी १८ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी तिचे वडील रामगोपाल रणजित चितोरिया {वय ६५} यांनी शिर्डी पोलिसांत तक्रार दिली. त्यांची दि. २४ फेब्रुवारी रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास किराणा घेण्यासाठी गेली. ती घरी परत न आल्याने व २ दिवस शोधाशोध केली. मात्र मिळून न आल्याने त्यांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. अधिक तपास शिर्डी पोलीस करीत आहे.