Breaking News

आरेतील आदिवासींना आरेच्या बाहेर जावे लागणार नाही - रविंद्र वायकर


मुंबई - गेली अनेक वर्षे आरेच्या जगंलात वास्तव्य करणार्या आरेतील आदिवासींचे आरेतच पुनर्वसन करण्यात येईल. तसेच त्यांचे पुनर्वसन करीत असताना त्यांच्या उपजिविकेचाही निश्‍चित विचार करण्यात येईल, अशी ग्वाही जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार व राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी आरेतील आदिवासींना दिले. एवढेच नव्हे तर फोर्स वनच्या हद्दीतील आदिवासी पाड्यांना मुलभूत सुविधा देण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या तातडीने देण्याचे निर्देशही त्यांनी फोर्स वनच्या अधिकार्यांना दिले. 
गोरेगाव पूर्व फोर्स वनच्या हद्दीतील आदिवासी व बिगर आदिवासी यांना मुलभूत सोयी सुविधा व त्यांच्या पुनर्वसनासंदर्भात तसेच अंतर्गत रस्ते बांधणी अनुषंगाने उद्भवणार्या समस्यांबाबत आज शनिवारी केल्टीपाडा नंबर 1 येथे बैठक बोलविण्यात आली होती.