Breaking News

पालकमंत्री पंकजाताई करणार जिल्हा निर्मिती शिष्टमंडळाचे नेतृत्व अंबाजोगाई प्रकरणी मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांची घेणार भेट


अंबाजोगाई (प्रतिनिधी) - अंबाजोगाई जिल्हा करावा या मागणीसाठी अंबाजोगाईकर अनेक वर्षापासून लढा लढत आहे. दोन दिवसापुर्वी नारायणगड येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी शिष्टमंडळ गेले होते, मात्र त्यावेळी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी आश्‍वासन दिले की, मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्या मुंबई येथे भेटीच्या वेळा मी घेते, अंबाजोगाईकरांचे शिष्टमंडळ मुंबईला घेऊन या. तेथे भेट घालून देते असे आश्‍वासन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिल्यामुळे जिल्हा निर्मिती आंदोलनात एक पाऊल पुढे पडले अशी चर्चा होत आहे. 
मराठवाड्याचे पुणे संबोधले जाणार्या अंबाजोगाई शहरात प्रत्येक पक्ष, संघटना, नेत्यांचे गट, शाखा कार्यरत आहेत, त्यामुळे कोणी कोणाचे नेतृत्व सहज स्विकारत नाही. अंबाजोगाई जिल्हा निर्मिती हा एकमेव प्रश्‍न आहे की राजकारणात एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते कार्यकर्त्यांना एकत्र आणणारा आहे. अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमात जिल्हा विभाजनाच्या मुद्यावर चर्चेला तोंड फुटले. कुठलाही पक्षाभिनिवेश न ठेवता सर्वपक्षीय जिल्हा निर्मितीच्या प्रश्‍नावर बैठकीला सर्वजण आले.