युवाप्रताप राज्यस्तरीय कृषी व सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर याना राज्यस्तरीय युवा संघटन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या ११ फेब्रुवारीला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल युवा नेते आकाश दळवी यांनी त्यांचा सत्कार केला, यावेळी प्रकाश बोण्डवे,गौरव धुमाळ, उदय तुपे, चिन्मय सर्जे, अभिजित ढाकणे, ऋतुराज टपले आदी उपस्थित होते.
राज्यस्तरीय युवा संघटन पुरस्कार खामकर यांना जाहीर
Reviewed by Dainik Lokmanthan
on
14:12
Rating: 5