Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘ग्रँड कॉलर’ने सन्मान


पॅलेस्टाइन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पॅलेस्टाइनच्या दौर्‍यावर असून शनिवारी, त्यांना भारत आणि पॅलेस्टाइनमध्ये परस्पर चांगले राजकीय संबंध राखण्यात महत्वाचे योगदान दिल्याबद्दल पॅलेस्टाइनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या हस्ते ‘ग्रँड कॉलर ऑफ दि स्टेट ऑफ पॅलेस्टाइन’ या सन्मानाने शनिवारी गौरविण्यात आले. पॅलेस्टाइनमध्ये आलेल्या राजांना, देशाच्या किंवा सरकारांच्या प्रमुखांना तसेच त्यांच्या समकक्ष पद भूषवणार्‍या परदेशी पाहुण्यांना दिला जाणारा हा सर्वोच्च सन्मान आहे.