Breaking News

नागरिकांनी दिले बिबट्याच्या बछड्याला ‛जीवनदान’


आश्वी : प्रतिनिधी :- आईपासून दुरावलेला, भुकेने व्याकूळ झालेल्या आणि हिंस्त्र प्राण्याच्या हल्यात जखमी झालेल्या बिबट्याच्या बछड्याला संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील सूज्ञ नागरिकांनी ‛जीवनदान’ देत निसर्गाच्या हवाली केले. या सत्कृत्याबद्द्द्दल चणेगाव ग्रामस्थांच्या पशुप्रेमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
भारतीय संस्कृतीने दिलेली ‘प्राणीमात्रावर प्रेम करा’ ही शिकवण चणेगावच्या ग्रामस्थांनी नुकतीच आचरणात आणून समाजासमोर एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे. चणेगाव शिवारात मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र असून झाडा-झुडपाचे प्रमाण जास्त बिबट्याला येथे लपण्यासाठी खूप जागा आहे. त्यामुळे बिबट्याचा या परिसरात वावर वाढला आहे. येथील शेतकरी अण्णा गुळवे, रोशन गुळवे व सुचित पाटोळे हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात नित्याची कामे करत असताना लगतच्या कांद्याच्या शेतात त्याना हिस्रं प्राण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ते तेथे गेल्यानतंर त्याना बिबट्याचे एक बछडे वेदनेने विव्हळताना दिसले. त्यांनी त्या बछड्याला सुरक्षितस्थळी आणून या घटनेची माहिती वनविभागाचे अधिकारी सुतार यांना दिली. त्यानंतर दत्तात्रय लोहाळे, बाळासाहेब लोहाळे, जितेंद्र बुधे, प्रविण लोहाळे, विनय गुळवे, सुनिल पाटोळे, अशोक पाटोळे, ह्रुशिकेश पाटोळे, नाथा गुळवे आदींनी या बछड्याला पाणी व दूध पाजून जीवनदान दिले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनकर्मचारी चौधरी हे घटनास्थळी दाखल झाले. काहीवेळाने बिबट्याच्या या बछड्याला निसर्गात सोडून देण्यात आले.