Breaking News

अहमदनगरच्या तरूणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न


मुंबई : मंत्रालयाच्या गार्डन समोर अहमदनगर जिल्ह्यातील अविनाश शेट्टे (वय 28) या तरुणाने मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न के ला. सुदैवाने पोलिसांनी अविनाश शेटे या तरूणाला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहे. अहमदनगर येथील अविनाश शेटे या 25 वर्षीय तरुणाने मंत्रालया गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अविनाश शेटे याने सहाय्यक कृषी अधिकारी या पदासाठी परीक्षा दिली होती. मात्र याबाबत सरकारने क सलाही निर्णय घेतल्याने अविनाश वारंवार मंत्रालयात चकरा मारत होता. वारंवार मंत्रालयात फेर्‍या मारून थकलेल्या अविनाशने बुधवारी मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पोलिसांनी अविनाशला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरूवात केली आहे. पंधरा दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील या वृध्द शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण आठ दिवसांनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राजाराम गायकवाड या शेतकर्‍यांने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. जिल्हा स्तरावर न्याय मिळत नसल्यामुळे, मंत्रालयात तक्रारी घेऊन येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. आपल्या व्यथा घेऊन मंत्रालयात येणार्‍या, तर कधी मंत्रालयातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे मंत्रालयातील सुरक्षेवर मोठा ताण पडत आहे. गेल्या आठवड्यामध्ये एका तरूणाला किटकनाशकासह पोलिसांनी ताब्यात घेतले होते.