Breaking News

खंडणीचे गुन्हे दाखल करा पण तक्रारीचीही चौकशी आवश्यक

औरंगाबाद पोलीसांची तत्परता नाशिक पोलीसांनी दाखविण्याची गरज

नाशिक/कुमार कडलग :- औरंगाबाद येथे ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीच्या नावावर पालिसीच्या बहाण्याने नवजीवन चा धंदा करणारा ठग नाशिकमध्येही राजरोस परताव्याची अतिशोयोक्त अमिष राजरोस दाख वित असताना जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंञणा बघ्याची भुमिका घेत असल्याने सखेद आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.तक्रार नाही म्हणून कारवाई करता येत नाही असा बहाणा करणारी पोलीस यंञणा तक्रारअर्जावर कारवाई न करता तक्रारदाराला अडकविणार्या ठगाला पुरक भुमिका घेत असल्याने सदरक्षणायचे मुसळ केरात रूतले आहे.

सन 2011 मध्ये ओरिऐन्टल इन्शुरन्स कंपनीच्या नावावर ठगेगीरी करणार्या एका विमा एजन्टच्या मुसक्या आवळल्या होत्या.ओरिएन्टलची पालिसी देतो असे सांगून हा एजन्ट विमा इच्छुकांकडून पालिसी प्लन तक्त्याप्रमाणे रक्कम घ्यायचा आणि प्रत्यक्ष अल्प रक्कमेची ओरिएन्टल पालीसी त्या ग्राहकाला द्यायचा.बाकी उरलेल्या मोठ्या रकमेचा हिशेब देण्यासाठी नवजीवन लाईफ इन्शुरन्स नावाची कंपनी स्थापन केली.सन 2004 पासून ही ठगेगीरी सुरू होती.ओरिएन्टल कंपनीच्या पालीसीसाठी प्रत्येक विमा इच्छुकाकडून घेतलेल्या दिड हजार रूपयांपैकी केवळ 90 रूपयांच्या अपघाती विमा पालीसी ग्राहकाला द्यायचा.अशी माहीती औरंगाबादचे तत्कालीन पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाली होती.

विष्णू रामचंद्र भागवत असे या इसमाचे नाव तत्कालीन तपासात निष्पन्न असून त्याच्या पत्नीच्या नावावरऔरंगाबाद परिवहन विभागात 46 चारचाकी गाड्यांची नोंद असल्याची माहीती पोलिस उपायूक्त घार्गे यांनी तेंव्हा दिली होती.धंद्याचे उद्दिष्ट पुर्ण करणार्या एजन्टला या गाड्या भेट म्हणून दिल्या जायच्या . परिवहन खात्याकडे नोंदणी माञ मुळ मालक असलेल्या भागवत परिवाराच्या नावाने कायम ठेवारचा.काही महिन्यानंतर सर्व्हिसींगचा बहाणा करून एजंटकडून गाडी परत घ्यायचा .अशा दुहेरी फसवणूकीचे जाळे फेकणारे विष्णू भागवतचे कारस्थान औरंगाबाद पोलीसांनी सहा वर्षापुर्वीच उध्वस्त केले.

औरंगाबाद पोलीसांनी दाखवलेली तत्परता नाशिक पोलीसांनी न दाखविल्याने विष्णू रामचंद्र भागवत हेच नाव धारण केलेल्या इसमाने नाशिकमध्ये आपला ठग संसार थाटला असून जगाच्या अर्थशास्रात भुत आणि भविष्यातील हजारो वर्ष शक्य नाही असा अतिशोयोक्ती दर्शविणार्या परताव्याचे अमिष दाखवून पैसे गोळा करण्याचा उद्योग सुरू केला आहे.पाच वर्षात दामदुप्पट देण्याचे धाडस खाजगी क्षेञातील खरबोचे व्यवहार असणार्या किंवा राष्ट्रीय गंगाजळीचा भार उचलणार्या राष्ट्रीयकृत बँकाही दाखवू शकत नाही तिथे विष्णू भागवत नावाचा इसम कंपनी स्थापन केल्या दिवसापासून भरघोस परतावा देण्याचा दावा कसा करू शकतो? या इसमाने स्थापन केलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या कार्यशैलीत काम करणार्या एजन्टला सात आठ वर्षात आठशे ते दोन हजार कोटी रूपयांची रक्कम कमावण्याची संधी कसा देऊ शकतो? कुबेराची मती कुंठीत करणारे हे आर्थिक समीकरण घेऊन नाशिकला स्थिरस्थावर झालेल्या आणि औरंगबाद पोलीसांनी ठग म्हणून जाहीर केलेल्या या इसमाने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता नाकारता येत नाही.

खुले आम हा गोरखधंदा सुरू असताना नाशिक पोलीस किंवा जिल्हा प्रशासन स्वतःहून या प्रवृत्तींच्या मुसक्या आवळण्याची तसदी घेताना दिसत नाहीत.उलट काही जाणकारांनी तक्रार केली तरी त्यावर ढम्म भुमिका प्रशासनाकडून घेतली जाते.5 जून 2016 रोजी एका माहीती अधिकार कार्यकर्त्याने नाशिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांना या कंपनीच्या कार्यशैलीची चौकशी करावी असा विनंती अर्ज दिला होता.गुन्हे शाखेने या अर्जावर या क्षणापर्यंत कुठलीही कारवाई केल्याचे वृत्त नाही.तथापी अर्जदार माहिती अधिकार कार्यकर्त्यावर कंपनी संचालकाच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल क रण्याची तत्परता माञ चार दिवासातच दाखवली,5 सप्टेंबर 2016 ला कंपनीची चौकशी व्हावी असा अर्ज दाखल होतो चार दिवसानंतर अर्जदाराविरूध्द गुन्हे शाखा युनीट एक खंडणीची तक्रार दाखल करते.

हा निव्वळ योगायोग म्हणायचा का? अर्जदार हा गुन्हेगार आहे किंवा नाही हा तपासाचा आणि त्यावर होणार्या न्यायदानाचा विषय आहे.त्यावर भाष्य करणे योग्य नसले तरी मधल्या चार दिवसात ज्या कंपनीविषयी तक्रार आली त्या कंपनीची साधी चौकशी करण्याची तसदी का घेतली नाही हा प्रश्‍न अनेक शंकांना वाव निर्माण क रतो.केबीसीच्या कार्यशैलीकडेही या पध्दतीचे दुर्लक्ष झाल्याने काहींना आत्महत्या करावी लागली.अनेकांचे संसार उध्वस्त झाले.त्याचे पाप तत्कालीन पोलीस अधिकार्यांच्या माथ्यावर आजही वावरत आहे,या प्रकरणातही सन 2016 मध्ये ज्या पोलीस अधिकार्यांनी या फसवणूक ठेकेदारांना पाठीशी घातले त्यांच्या पापाचे आणखी बळी जाण्याआधी पो.आयुक्त डा.रविंद्र कुमार सिंघल आणि त्यांच्या विद्यमान पोलीस अधिकारी कर्मचार्यांनी या ठगांच्या मुसक्या आवळण्यासाठी पावले उचलावीत अशी सामान्यांची अपेक्षा आहे.


उद्याच्या अंकातः*आठ वर्षात आठशे ते दोन हजार कोटीची कमाई कशी होते?
*वेगवेगळ्या आठ पैकी सात कंपन्यांची फसवी कार्यशैली
* सन 2016 चा तो तक्रार अर्ज निकाली की प्रलंबीत
*खंडणीच्या गुन्ह्यामागचे षडयंञ
*सहकार खात्याची भुमिका