श्रीरामपूर : बालसंन्यासी हरीबाबा सांस्कृतिक कला व क्रीडामंच यांच्यावतीने शिरसगाव येथे १ फेब्रुवारीपासून यादव ग्राउंड येथे भव्य प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी माजी पं.स. सदस्य गणेश मुद्गुले, नानासाहेब गवारे, माजी सरपंच सतीश गवारे, नवनाथ ताके, निलेश यादव, माजी उपसरपंच नितीन गवारे आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे निलेश यादव, दत्ता जाधव हे सूत्रसंचालन करीत आहेत. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास माजी प. स. सदस्य गणेश मुद्गुले यांच्यातर्फे रु २१००१, व्दितीय रु १५००१/- ग्रा. प. सदस्य नानासाहेब गवारेतर्फे, तृतीय रु ११००१/- माजी सरपंच सतीश गवारे व चेअरमन नवनाथ ताके यांच्यावतीने चतुर्थ रु ७००१/- युवा नेते महेश ताके व जावेद पठाणतर्फे इतर अकरा बक्षिसे रु २१०१ अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेसाठी मथुरानगर मित्रमंडळ, वर्ल्ड ऑफ जिजस सेवा संस्था, महालक्ष्मी मित्रमंडळ, बजरंग तरुण मंडळ, कारवाडी तरुण मंडळ यांचे सहकार्य लाभत आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, आवाहन माजी प. स. सदस्य गणेशराव मुद्गुले यांनी केले आहे.