Breaking News

जर्मन तंत्रज्ञानावर आधारित पहिला पर्यावरणपूरक प्रकल्प दापोलीत

रत्नागिरी, दि. 20, फेब्रुवारी - जर्मन तंत्रज्ञान वापरून कोकणातील दापोली तालुक्यातील करंजाळीसारख्या लहानशा खेड्यात उद्योग सुरू करण्याचे धाडस शिरीष जोशी आणि मार्कस झायलर यांनी केले आहे. या दोघांना येथील जनतेचे आणि सरकारचे कायम सहकार्य राहील, असा विश्‍वास केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी झायलर-गारेपा इं डिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना व्यक्त केला. 

जगात नवतंत्रज्ञान विकसित करण्यात जर्मनी अग्रेसर आहे. तेथील तंत्रज्ञानाचा भारतात वापर करून भारतासह आशियातील उद्योगांना योग्य दरात मशिनरी पुरवण्याचे काम ही कं पनी करणार असल्याने या कंपनीचा चढता आलेख कायम राहील. दापोली तालुक्यातील करंजाळीसारख्या दुर्गम परिसरात कंपनी स्थापन करून येथील तरुणांना रोजगार दिल्याबद्दल शिरीष जोशी यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, अशा शब्दांत गीते यांनी जोशी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
कार्यक्रमात शिरीष जोशी यांनी प्रास्ताविकात कंपनी सुरू करण्यामागचा उद्देश, कंपनीमुळे उपलब्ध होणारा रोजगार, कंपनीकडून तयार करून निर्यात करण्यात येणारी मशिनरी याबाबत उपस्थितांसमोर आढावा मांडला. मार्कस झायलर यांनीदेखील कंपनीला येथे पोषक वातावरण असून येथील ग्रामस्थांचे सहकार्य चांगले असल्याचे सांगून कंपनी निश्‍चिसतच येथील समस्या सोडवण्यासाठी भविष्यात खारीचा वाटा उचलेल, असे आश्‍वासन दिले.
भारतातील उद्योजकांना जर्मनीतील तंत्रज्ञान वापरून तेथे विकसित केलेली यंत्रसामग्री भारतात आयात करणे आर्थिकदृष्ट्या महाग पडते. त्यामुळे भारतीय उद्योगांसह आशिया खंडातील उद्योगांना जर्मन तंत्रज्ञान वापरून भारतीय बनावटीची मशिनरी उपलब्ध करून देऊन भारतातच रोजगार निर्मिती वाढवण्याच्या दृष्टीने जर्मनीतील मार्कस झायलर आणि क ोकणातील शिरीष जोशी या दोघांनी मिळून दापोली तालुक्यातील करंजाळी येथे झायलर गारेपा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हा पर्यावरणपूरक उद्योग सुरू करण्याचा मान मिळवला आहे. करंजाळी येथे बारा हजार स्क्वेअर फुटाची भव्य प्रकल्प शेड आकारात आली. मार्कस झायलर यांचा जर्मनीत गेली तीस वर्षे झायलर व्हॅक्यूम टेक्निक हा कारखाना आहे. या कारखान्यातून हेलियम टेस्टिंग मशिन, हेलियम रिकव्हरी मशिन, स्पेशल पर्पज मशिन, असेम्ब्ली लाइन्स, व्हॅक्युम सिस्टिम्स आदी मशिनरी तयार करण्यात येणार आहेत. येथे तयार होणार्याप मशिन्सचा वापर इलेक्ट्रिक स्वीच गिअर इंडस्ट्रीज, न्युक्लिअर प्लॅन्ट, संरक्षण खात्याकरिता महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. स्थानिकांना या प्रकल्पात रोजगार मिळणार आहे. 
सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून येथे हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून कोकणाला वेगळा औद्योगिक आयाम देण्यात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. येथे तयार झालेल्या मशिनरीची विक्री आपल्या देशासह विदेशातदेखील केली जाणार असल्याने कोकणातील पहिला-वहिला पर्यावरणपूरक प्रकल्प कोकणात येणार्यो अन्य पर्यावरणपूरक प्रक ल्पांसाठी श्री गणेशा ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.