Breaking News

मुंबईंकरांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार; शेलार यांनी केले मुख्यमंत्र्याचे अभिनंदन

मुंबई, दि. 14, डिसेंबर - देशातील सर्वांना हक्काचे घर मिळावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना जाहीर केली असून त्यासोबतच मुंबईतील झोपडपट्टीधारकांना हक्काचे पक्के घर मिळावे म्हणून राज्यातील भाजपा सरकारनेही अनेक उपायोजना हाती घेतल्या आहेत. त्यातीलच एक महत्वाचा निर्णय नुकताच राज्य मंत्रीमंडळाने घेतला असून या अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब होईल. त्याचा फायदा 18 लाख सामान्य मुंबईकरांच्या सुमारे साडेतीन लाख झोपडयांना होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे आम्ही तताम मुंबईकरांच्या वतीने स्वागत करतो व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो असे मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड आशिष शेलार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी समाजातील शेवटच्या माणसाला केंद्र स्थानी मानून अंत्योदय ही संकल्पना मांडली व त्यानुसार भाजपाचे केंद्रातील आणि राज्यातील सरकार अनेक योजना राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत घरे देण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्या दृष्टीने मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरक ारने अनेक उपाययोजना व निर्णय घेतले आहेत. मुंबईतील चाळीतील, जुन्या इमारतीमधील रहिवाशांच्या पुर्नविकासाला गती देण्यात आली असून त्यादृष्टीने आवश्यकते ते बदल कायद्यात करण्यात आले आहे. बीडीडी चाळींच्या विकासाला सुरूवात असून धारावी पुर्नविकासाच्या प्रकल्पालाही गती देण्यात येते आहे. तर कोळीवाडे आणि गावठाणे यांचे सिमांक न करण्यात येत असून सरकारने बांधकामालाही संरक्षण देण्याचा निर्णय घेतला. म्हाडा लेआऊट तसेच संक्रमण शिबिरांमधील रहिवाशांनाही हक्काची घरे मिळावीत म्हणून सरकार आवश्यकते कायद्यात बदल करते आहे. तर गृहनिर्माण धोरणामध्येही तशा प्रकारचे बदल असलेले गृहनिर्माण धोरणही राज्य शासनाने जाहीर केले.

मुंबईतील मुंबईचा सुमारे 62 ते 65 टक्के भाग हा झोपडयांनी व्यापलेला असून 65 लाख लोक झोपडपट्टीत राहतात असा अंदाज आहे. या झोपडपट्टीधारकांना पक्के घर मिळावे म्हणून आजपर्यंत विविध योजना आणण्यात आल्या पण त्यातील अटींमुंळे या योजना रखडल्या व सर्वसामान्य माणसाची ससेहोलपट सुरूच राहिली. आता त्यावर भाजपा सरकारने महत्वाचे व निर्णायक पाऊल उचलले आहे. खाजगी जमिनींवरील झोपडपट्टीधारकांच्या पुर्नविकासाच्या योजनांबाबत गती देणारे निर्णय सरकारने घेतले. तर नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय झाला असून हिवाळी अधिवेशनात त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर लाखो मुंबईकरांच्या घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे.