Breaking News

जव्हारच्या आदिवासी समाज संशोधकांना डॉक्टरेट पदवी

पालघर, दि. 20, फेब्रुवारी - थायलंडची राजधानी बँकॉक येथे नुकताच पार पडलेल्या कला-संस्कृती आदान -प्रदान,सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण व युवक कल्याण आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदेमध्ये जागतिक प्रतिभाशक्ती एकत्रीकरणाच्या विचारप्रणालीचे ळर्ळेी च्या विश्‍व संमेलनात जव्हार येथील नामवंत कवी, लेखक व आदिवासी समाज संशोधक मधुकर कावजी भोये व रवी लक्ष्मण बुधर यांना इमेज इंटरनॅशनल ऑनलाइन युनिव्हर्सिटी (युएसए) कडुन मानद (डि. लिट.) डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. 

बँकॉक येथील पर्यटन विभागाच्या अंतरराष्ट्रीय विश्‍लेषक डॉ. नीना यांच्या हस्ते हि पदवी प्रदान करण्यात आली. या संमेलनाचे आयोजन आय.आय.ओ. यु. (यु.एस.ए.) व डब्लू .टी. बी.आर. वर्ल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड डी. ए.सी., दुबई अक्रेडिटेशन सेंटर आणि आर.ओ. एच. एस.मॅनेजमेण्ट सिस्टम यांनी केले होते.यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ.क ौशिक गायकवाड डॉ.दीपक परब,कुलगुरू डॉ.के. आर.महाजन मार्गदर्शक डॉ.बी. एन.खरात(ओरोस महाविद्यालय मुंबई विद्यापीठ) अमरावती महाविद्यालय डॉक्टर अंजली ठाकरे नागपूर विद्यापीठातील अलका सप्रे जेष्ट साहित्यिक डॉक्टर अ. ना. रसनकुटे उपस्तित होते. यावेळी भारतातील दहा व्यक्तींना वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रातील डॉक्टरेट देण्यात आली.
नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्हयातील जव्हार सारख्या अति ग्रामीण भागातून आदिवासी समाजातील संशोधन प्रबंधासाठी (आदिवासीचें सण व उत्सव) मधुकर कावजी भोये यांना व आदिवासींचे नृत्य प्रकारासाठी रवी लक्ष्मण बुधर याना सन्मानाची ’मानद’(डि. लिट.) डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.डॉक्टरेट मिळाल्याने या दोघावरही अ भिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी जगभरातून 100 च्या वर मान्यवर उपस्थित होते.