Breaking News

काँग्रेस नेत्याच्या जावायाविरोधात गुन्हा


नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेला 11 हजार कोटींचा गंडा घालणाऱया नीरव मोदी, मेहूल चोक्सीनंतर देशातील आणखी एका कंपनीने एका सरकारी बँकेला 17 कोटींचा चुना लावला आहे .सीबीआयने ओरिएण्टल बँक ऑफ कॉमर्सचे 17 कोटी रूपयांचे कर्ज न फेडल्याप्रकरणी संभौली शुगर लि.चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक गुरमीतसिंग मान, उपसरव्यवस्थापक गुरूपालसिंग आणि अन्यविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुरूपालसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे जावई आहेत. सीबीआयने याप्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणांवर छापा टाकला आहे.