Breaking News

मनोहर पर्रिकर पुन्हा रूग्णालयात दाखल


गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना डीहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरचा त्रास जाणवू लागल्याने रविवारी संध्याकाळी बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजच्या रू ग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अगोदर पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या विकारामुळे मुंबईतील लीलावती रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ते 22 तारखेला स्पेशल विमानाने मुंबईतून गोव्याला आले. त्यानंतर त्यांनी थेट विधानसभा गाठली आणि अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर ते दोनापावला येथील आपल्या खासगी घरातून कामकाज पाहत होते.