मुख्यमंत्री साहेब ! मुजोर बिडीओला बडतर्फ कराल?
मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब !
आपण महाराष्ट्राच्या रयतेचे राजे आहात. त्या रयतेचे. ज्या रयतेच्या केसालाही धक्का लावाल तर खबरदार म्हणून दरडावणार्या छत्रपतींच्या राज्यातील रयत आपल्याकडे आशाळभूतपणे सतत पाहत असते. त्याच रयतेला राज्याचे सालदार असलेले नोकर सातत्याने पाण्यात पाहून पावलो पावली हिनवतात, अवमानीत करतात.
मुख्यमंत्री साहेब! शुक्रवार दि.23 फेब्रूवारी रोजी तर या हेटाळणीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या. रयतेचा सेवक असलेल्या एका बांडगुळाने आपली संस्कृती विदर्भाच्या वेशीवर नागडी करून तिचे खुले प्रदर्शन मांडले. आनंद लोकरे या गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी पंचायत समितीत गटविकास अधिकारी (बिडीओ) म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी आपण रूजू केलेल्या मुजोर प्रवृत्तीने एका सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्त्याला अत्यंत हिन, अश्लाघ्य शिवीगाळ करून महाराष्ट्र संस्कृतीची विटंबना तर केलीच पण लोकसेवक हमी कायदा, केंद्रीय आणि राज्या माहिती अधिकार कायदा 2005 ची पायमल्ली केली आहे.
साहेब! सुरेश शालीकराम दुरूगकर या गोंदिया शहरात राहणार्या सामाजिक कार्यकर्त्याने या आनंद लोकरे नावाच्या बिडीओ कडे माहिती अधिकार कायद्याला अधीन राहून पंचायत समितीशी संबंधित काही माहिती मागीतली होती. माहितीचा हा अर्ज पाहिल्यानंतर जनतेचा नोकर असलेल्या या बिडीओचे पित्त खवळले. या माहितीमुळे या आनंद लोकरे महाशयांचे काळे कारनामे उजागर होणार असतील कदाचीत, म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. अर्ज समोर दिसताच अर्जदार सुरेश दुरूगकर यांच्या 9146396650 या क्रमांकावर बिडिओ महाशहांनी त्यांच्या 9403454500 या क्रमांकावरून भ्रमणध्वनी केला. अगदी खालच्या पातळीवर, अर्वाच्च भाषेत या उच्च शिक्षित म्हणविणार्या अधिकार्याने अर्जदाराच्या जन्मदात्रीचा उध्दार केला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नक्कीच नाही. छत्रपतींच्या लोकभिमुख राज्याचे प्रमुख म्हणून प्रथम नागरीक आहात मुख्यमंत्री साहेब! महाराजांच्या काळापासून आजपर्यंत या राज्याची लोकसेवक संस्कृतीही रयतेच्या आई बहीणींचा उध्दार करण्याची परवानगी देत नाही. अशा जनद्रोह्यांना हत्तीच्या पायाखाली देण्याचा किंवा कडेलोट करण्याचा महाराजांचा शिरस्ता होता. आपल्यासारख्या सुज्ञ जाणकार अभ्यासू महाराजांसह त्यांच्या रयतेप्रती आस्था जिव्हाळा असलेल्या लोकनेत्याच्या कार्यकाळात या बिडिओने तो द्रोह करण्याचे नतद्रष्ट धाडस दाखविले आहे, तेही आपली जन्म कर्मभूमी असलेल्या विदर्भाच्या भुमीत.
मुख्यमंञी साहेब! या बिडिओवर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उद्या आपले सरकार त्याला निलंबितही करील. पुन्हा सहा महिने किंवा वर्षभरात आणखी कुणाच्या तरी आई बहिणीचा उध्दार करण्यासाठी सेवेत रूजू होईल. म्हणून या पत्राद्वारे आपणास रयतेच्या वतीने आव्हान आणि आवाहन आहे की, मुजोर बिडीओ आनंद लोकरे या महाशयांना निलंबीत नाही तर बडतर्फ करा, ज्यायोगे अन्य मुजोर प्रवृत्तीचे लोकसेवक अशा प्रकारचे नतद्रष्ट धाडस करणार नाहीत.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेत,
धन्यवाद!
कुमार कडलग,
नाशिक