Breaking News

डल्ला मारणाऱ्यांचे हल्लाबोलचे नाटक,पाचपुतेच्या प्रयत्नातून रस्त्यांसाठी निधी


श्रीगोंदा/ प्रतिनिधी/- तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री जर मोठ्या प्रमाणात निधी देत आहेत. तर मग त्यांच्या विरोधात हल्लाबोलचे नाटक कश्यासाठी? ज्यांनी डल्ला मारला आहे, तेच हल्लाबोल करत आहेत. अशी टीका माजीमंत्री पाचपुते समर्थक व भाजपचे पंचायत समिती सदस्य शहाजी हिरवे, दत्तात्रय कोठारे, संदीप नागवडे, एम. टी. दरेकर ,एम. डी. शिंदे यांनी आमदार राहुल जगताप यांच्यावर प्रसिद्धी पत्रकात टीका केली आहे. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मिळविण्यासाठी माजी मंत्री पाचपुते प्रयत्न केला. त्या रस्त्याला मंजुरी मिळाली की लगेच आमदारांनी प्रसिद्धी पत्रक काढून आपणच या रस्त्यासाठी निधी आणल्याचा आव आणला आहे. आमदार जर सांगतात की मी पोकळ गप्पा मारत नाहीत. पण आमदार फक्त माजी मंत्री पाचपुते यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विकास कामाचे पत्र गुपचूप काढायचे व प्रसिद्धी माध्यमांना द्यायचे हीच तुमची कृती आहे काय? असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. नगर तालुक्यातील बारादरी च्या रस्त्यासाठी सुधीर पोटे यांच्या मागणीवरून माजी मंत्री पाचपुते यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून निधी मिळविला. पण हे लोकप्रतिनिधी सांगतात की तालुक्यातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेतून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. पण आमदार हे पाचपुतेंच्या प्रयत्नाचे श्रेय घेतात. 

जर तुम्हाला श्रेय घ्यायचेच तर नगर-दौंड रस्त्याचे श्रेय घ्या, हिंगणीच्या पुलाचे व बंधाऱ्यांचे श्रेय आमदारांनी घ्यावे. त्याचबरोबर भाजप सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या जिल्हा सहकारी बँकेच्या सभासदांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफी झाली आहे या माफीचेही श्रेय घ्या. जे सरकार तालुक्याच्या विकासासाठी आमदारांचे ऐकून निधी देत आहेत. तर त्यांच्या विरोधात हल्लाबोल करण्याचा या लोकप्रतिनिधींना अधिकार काय? असा सवाल भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.