Breaking News

शरीर विक्रयामुळे संगमनेर होतेय बदनाम!


संगमनेर शहर प्रतिनिधी :- शहर व तालुक्यात कोठेही शरीरविक्रीचा व्यवसाय होत नसताना गेल्या काही महिन्यांपासून शहरातील बाजारपेठेत एक महिला हा व्यवसाय चालवत आहे. त्यामुळे संगमनेर शहराचे नाव बदनाम होत आहे. एका धार्मिक स्थळापासून अवघ्या काही फुटावर हा व्यवसाय चालत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेकदा नको ते चित्र पहावयास मिळत आहे. 

संगमनेर शहराची परंपरा मोठी आहे. आसपासच्या तालुक्यात वेश्याव्यवसाय उघडपणे सुरू असताना संगमनेर शहर मात्र यापासून अलिप्त राहिले आहे. या शहरात कुठेही असा व्यवसाय चालत नाही. मात्र गेल्या काही महिन्यापासून शहराच्या मध्यवस्तीत एक महिला हा व्यवसाय करीत आहे. तिला काही महिलांचे छुपे सहकार्य मिळत आहे. काही प्रतिष्ठित व्यक्तीचाही यात सहभाग असल्याचे बोलले जाते. 

पुजा नामक महिला हा व्यवसाय चालवत आहे. या पुजामुळे अनेकांची मजा होत असली तरी परीसरातील नागरिकांना मात्र नाहक सजा मिळत आहे. ज्या ठिकाणी हा व्यवसाय छुप्या पध्दतीने चालविला जातो, त्या ठिकाणापासून अवघ्या काही फुटाच्या अंतरावर एक धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी दर्शनाला येणाऱ्या नागरिकांना काही महिला निदर्शनास येत आहे. त्याचे अश्लील चाळे या नागरिकांचे डोकेदुखी ठरत आहे. 

संगमनेर शहर पोलिस ठाणे या ठिकाणापासून फारशा अंतरावर नाही या ठिकाणी चालवणाऱ्या शरीर विक्रीच्या व्यवसायाला संतापून काही नागरिकांनी पोलिस आधिकार्यांकडे तक्रार केल्या होत्या. मात्र एकाही अधिकार्याने या तक्रारीची दखल घेतली नाही. यामुळे पोलिसाच्या भुमिकेबाबत संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करुन या ठिकाणी चालणारा अवैध व्यवसाय त्वरित बंद न झाल्यास महिला रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तविली जात