’महापौर चषक’ खुल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थाटात शुभारंभ
जळगाव, - महर्षी वाल्मिकी क्रीडा फाऊंडेशन आयोजित स्व.मिलिंद पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ ’महापौर चषक’ राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन जल्लोषात झाले. आज सकाळी खानदेश सेंट्रल येथून महर्षी वाल्मिकी नगर बगीचा येथील कबड्डी स्पर्धा मैदानापर्यंत भव्य रँली काढण्यात आली यात एक मशाल घेतलेला युवक व त्यामागे सर्व सहभागी संघांतील खेळाडू उत्साहाच्या वातावरणात सहभागी झाले होते.
त्यानंतर महर्षी वाल्मिकी क्रीडा फाऊंडेशनच्या कलाकारांनी भारत हमको जान से प्यारा है आणि कबड्डी गीतांवर बहारदार असा नृत्याविष्कार सादर केला. यावेळी सर्वच प्रेक्षक आणि मान्यवर तसेच उपस्थित खेळाडू मंत्रमुग्ध झाले होते. उत्साहपूर्ण देशभक्तीपर वातावरण यावेळी निर्माण झाले.सर्वांनी भारत माता की जय असा जयघोष नृत्यसंपल्यावर केला.
मान्यवरांच्या शुभहस्ते यावेळी महर्षी वाल्मिकी क्रीडा फाऊंडेशनच्या सन 2016-2018 कार्यपुस्तिका चे प्रकाशन यावेळी करण्यात आले.
कबड्डी संघांच्या खेळाडूंना मैदानात जावून मान्यवरांनी हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. त्यानंतर श्रीफळ वाढवून,राष्ट्रगीत झाले व कबड्डी सामन्यांस सुरुवात झाली. एकाच वेळेस दोन साखळी सामने मैदानात खेळविले गेले.