Breaking News

परळ रेल्वे स्थानकात गर्डर टाकण्याचे काम पूर्ण ; मरेची वाहतूक पूर्ववत


मुंबई, - परळ आणि करी रोड येथील लष्कराकडून उभारण्यात येणार्‍या पादचारी पुलांसाठी गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर 4.30 च्या सुमारास मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. पुलाचे काम सुरू असल्याने 6 तासापासून ही वाहतूक बंद होती. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर ती पुन्हा सुरू क रण्यात आली. पुलाचे काम जलद गतीने पूर्ण झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, दादर स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी गर्दी केली आहे.