Breaking News

नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 26 लाखांच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी-आ. शिरीष चौधरी


जळगाव, - अमळनेरमधील चार गावांना महिला शौचालय तर कळमसरे येथे अभ्यासिका उभारल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या वतीने नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत 26 लाखांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून यात 4 गावांच्या महिला शौचालयासह कळमसरे येथे अभ्यासिकेचा समावेश असल्याची माहिती आ. शिरीष चौधरी यांनी दिली. आ चौधरी यांच्याच पाठपुराव्याने हि विकास कामे मंजूर झाली आहेत.

सदर योजनेतून कळमसरे येथे अभ्यासिका (6 लाख,), तर सावखेडा, आर्डी ,मांडळ व बोदंर्डे ता पारोळा येथे प्रत्येकी 5 लाख निधीतून सार्वजनिक महिला शौचालये बांधली जाणार आहेत. दरम्यान सदर कामांच्या मंजुरीसाठी आ चौधरी यांनी 13 नोव्हें 2017 रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र देऊन नाविन्यपूर्ण योजना सन 2017-18 अंतर्गत 55 लाखांच्या विकास कामांना मंजुरी देऊन निधीची मागणी केली होती, त्या अंतर्गत या कामांना मंजुरी मिळाली असून ढेकूसीम व पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथे महिला शौचालयाचा प्रस्ताव प्रलंबित राहिला आहे, परंतु त्या कामानाही लवकरच मंजुरी मिळेल असा विश्‍वास आ चौधरी यांनी व्यक्त केला आहे.