Breaking News

युवकांना पाठबळ द्या : कोल्हे


कोपरगांव प्रतिनिधी  :- गावच्या विकासात धडपणा-या युवकांच्या पाठीशी राहून ग्रामस्थांनी त्यांना पाठबळ द्यावे, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे यांनी केले.तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीच्यावतीने १४ व्या वित्त आयोगातून ४ लाख ८८ हजार १२५ रुपये खर्चाच्या आरओ प्रकल्पाचे उदघाटन शनिवारी {दि. १०} आ. कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी माजी उपाध्यक्ष रघुनाथ सांगळे होते.

प्रारंभी सरपंच ठकुबाई सांगळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक केले. याप्रसंगी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष सोपानराव पानगव्हाणे, संचालक साहेबराव कदम, प्रदिप नवले, निवृत्ती बनकर, सुभाष आव्हाड, माजी सभापती सुनिल देवकर, माजी सरपंच धोंडीबा सांगळे, विनोद सांगळे, संजय सांगळे, बद्रीआप्पा सांगळे, वनिता सांगळे, मोहन शेलार, ज्ञानदेव सांगळे, गणेश आव्हाड, नारायण कुटे आदींसह ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामसेवक गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच प्रविण सांगळे यांनी आभार मानले.