Breaking News

ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वाटचाल केल्यास यश निश्चित : बिरोले


आश्वी : प्रतिनिधी :- विद्यार्थ्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचाराचे अनुकरण केले आणि जिद्द चिकाटी, अथक परिश्रामबरोबरच ध्येय डोळ्या समोर ठेऊन वाटचाल केली तर यश निश्चित मिळेल, असे मत युटेक शुगर लिमिटेडचे संस्थापक रविंद्र बिरोले यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील पिपंरणे येथील प. पू. गंगागिरी महाराज व न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या वार्षिक पारितोषीक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी बापूसाहेब देशमुख, अँड. रामदास शेजुळ, नलावडे, सुरेश ठोंबरे, अशोक कोकणे, सुधाकर रोहम, कैलास काळे, डि. एम. देशमुख, कारभारी राहिंज, सरपंच इंद्रायणी थोरात, उपसरपंच अजित देशमुख, किरपाल डंग आदींसह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. दरम्यान, विद्यालयातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी मुकूंद डांगे प्रास्ताविक यांनी केले. ललित शेळके यांनी सूत्रसंचालन केले.