Breaking News

मुलगा पैसा कमवणारा नसावा तो परमार्थ करणारा असावा


ह.भ.प. बद्रीनाथ महाराज नवल (पैठणकर) गुंफा येथील श्री क्षेत्र स्वयंभू काळेश्‍वर देवालयात सुरू असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरीनाम सप्ताह व ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळ्याचे दुसरे पुष्प ह.भ.प. बद्रीनाथ महाराज नवल यांनी गुंफिले. या सेवेतून त्यांनी भाविकांना संबोधित केले. आजच्या युगात प्रत्येक कुटुंबात असणारा मुलगा पैसा कमवणारा नसावा तर तो परमार्थ करणारा असावा कारण या पिढ़ीला परमार्थच शिस्त लावू शकतो, सुख देवू शकतो. संत सेवा सर्वात श्रेष्ठ आहे. कारण ही संतसेवा केल्यानंतर कोणालाही पश्‍चाताप होत नाही. संत सुखाला व दुखःला समान मानतात. म्हणून संत या जगात श्रेष्ठ आहेत. यावेळी विविध ठिकाणाहून गायक, टाळकरी, विनेकरी, भक्तगण उपस्थित होते.