Breaking News

श्रीगोंदा पंचायत समितीला त्या विजय चा मोह सुटेना ?


अमर छत्तीसे /श्रीगोंदा /- श्रीगोंदा पंचायत समितीला त्या "विजय " चा मोह सुटेना अशी अवस्था पंचायत समितीच्या अधिकारी व पदाधिकारी यांची झाली आहे. आज याच वादग्रस्त विजय पठारे यांनी पंचायत समिती सभागृहात आज इ-ग्राम व आपले सरकार या योजनेबाबत स्वतः पठारे यांनी ग्रामसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. 
यासंदर्भात अधिकची मिळालेली माहिती अशी की , श्रीगोंदा तालुक्यातील इ -टेंडर मध्ये मोठ्या प्रमाणांत घोळ चालू आहे. या इ-टेन्डर बाबत दैनिक लोकमंथन ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पंचायत समिती प्रशासनाला जाग येईल? अशी अपेक्षा होती. मात्र त्याउलट परिस्थिती झाली असून त्या वादग्रस्त विजयने तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांना ई-ग्राम व आपले सरकार या ऑनलाईन वेबसाईट चे प्रशिक्षण दिले आहे. पण ज्या व्यक्तीच्या मुळे तालुक्यातील टेंडर मध्ये घोटाळा होत असेल तर पुन्हा त्याच व्यक्तीला प्रशिक्षण देण्याचा अधिकार काय आहे? असा सवाल उपस्थित होत आहे . 

त्या विजयकडे तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व ग्रामपंचायती च्या सरपंच व ग्रामसेवक अधिकारी यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या आहेत. त्याची तपासणी प्रभारी गटविकास अधिकारी यांनी करणे गरजेचे आहे. 

तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीच्या "कि " त्याच्या ताब्यात ?

तालुक्यातील ८४ ग्रामपंचायती पैकी बहुतांशी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक व सरपंच यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या त्या विजयच्या ताब्यात आहेत. एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त खात्यावर १४ व्या वित्त आयोगाचा निधी व इतर निधी मोठ्या प्रमाणांत जमा हॊतॊ. त्या डिजिटल “कि” च्या आधारे जर काही गैरप्रकार झाला. तर त्याला जबाबदार कोण? आजही तालुक्यातील बहुतांशी ग्रामपंचायतीच्या डिजिटल स्वाक्षऱ्या त्या विजयच्या ताब्यात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. 

तालुका समन्वयकांना प्रशिक्षण देण्याची गरज -

श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये मोठ्या प्रमाणांत ऑनलाईन चे कामे होतात. त्यासाठी तालुका समन्वयक म्हणून एका व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. पण त्याच व्यक्तीला ईं-ग्राम व इंदिरा आवास योजनेबाबत परिपूर्ण माहिती नाही. असा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या संगणक क्लार्क कडून तक्रारी होत आहे. त्यामुळे त्या तालुका समन्वयकाला देखील प्रशिक्षण देण्याची गरज आहे.