Breaking News

आमदार मोनिका राजळेनी घेतली कोष्टी कुटुंबीयांची भेट


पाथर्डी/प्रतिनिधी/- शहरातील मध्यवर्ती असलेल्या अष्टवाडा भागात २९ जानेवारी२०१८च्या रात्री १० वाजेनंतर आणि ३० जानेवारी२०१८ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या आधी चोरट्याच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दुर्गा कोष्टी ( वय ६०) यांच्या कुटूंबाची आमदार मोनिका राजळे यांनी बुधवार,७ फेब्रुवारीला २०१८ ला भेट घेऊन सांत्वन केले. 
आ. मोनिका राजळे म्हणाल्या की,या घटनेबाबत माझी पालकमंत्री तसेच अहमदनगरचे पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झाली असुन, तपास योग्य दिशेने चालू असुन पोलीस लवकरच या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करतील. असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पालिकेचे गटनेते नंदकुमार शेळके, पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर, सोमनाथ खेडकर, नगरसेविका संगिता गटानी, पंचायत समिती सदस्य सुनील ओहळ, प्रशांत शेळके, पत्रकार नितीन गटानी, नगरसेवक अनिल बोरुडे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके आदी जण उपस्थित होते. 

पाथर्डीतील नागरिकांनी सध्या चोरट्याचा धसका घेतला असुन पाथर्डी पोलिस चोरी सत्र गांभीर्याने कधी घेतात ? शहरात, तालुक्यातील चोरट्याचा बंदोबस्त कधी करतील याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.