Breaking News

ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे निधन


मुंबई : ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 83व्या वर्षी सुधा करमरकर यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्‍वास घेतला.लिटील थिएटर’ ही बाल रंगभूमीसाठीची चळवळ सुधा करमरकर यांनी स्थापन केली होती. त्याचप्रमाणे आविष्कार, छबिलदास चळवळीत ही अग्रस्थानी होत्या. दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत त्यांनी रंगभूमीची सेवा केली. सुधा करमरकर यांचे घराणं मूळ गोव्याचे असले, तरी त्यांचा जन्म मुंबईत 18 मे 1934 साली झाला. वडील तात्या आमोणकर हे गिरगावातील साहित्य संघ या नाट्यसंस्थेशी संलग्न होते. त्यामुळे सुधाताईंना घरातूनच नाट्यसेवेचं बाळकडू मिळाले होते.वयाच्या 18 व्या वषी त्या भरतनाट्यममध्ये पारंगत झाल्या. त्यानंतर मो. ग. रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशल नायिकेची म्हणजे रंभेचीच भूमिका मिळाली, आणि ती भूमिका गाजली.