औरंगाबाद : कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अशी ओळख असलेले आयएएस अधिकारी सुनील केंद्रेकर यांचे स्वागत करण्यासाठी मराठवाड्यातली जनता उत्सुक होती. मात्र 24 तासांच्या आतच त्यांची बदली रद्द करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी पुरुषोत्तम भापकरच कायम राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मराठवाड्यातील भाजपच्या काही बड्या नेत्यांनी अधिकार्यांच्या संगनमताने आपले राजकीय वजन वापरुन ही बदली रोखल्याची जोरदार चर्चा आहे. राज्यातील बारा सनदी अधिकार्यांच्या बदलीचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले होते. मात्र केंद्रेकरांच्या बदलीचे आदेश रद्द करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिवांकडून कळवण्यात आले. त्यामुळे मराठवाड्याच्या विभागीय आयुक्तपदी आता पुरुषोत्तम भापकरच कायम राहतील.
सुनील केंद्रेकरांची मराठवाड्यातली बदली रद्द
Reviewed by Dainik Lokmanthan
on
22:56
Rating: 5