Breaking News

नेटके ड्रॉईंग अ‍ॅकॅडमी आयोजित विद्यार्थ्यांच्या चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन

रंगमय जीवनाचे प्रतिबिंब आपल्या कागदावर रेखाटत निसर्ग, प्राणी, कार्टुन, व्यक्तीचे हुबेहुब चित्रण केलेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रकला प्रदर्शन नेटके ड्रॉईंग अ‍ॅकॅडमीच्या वतीने महावीर कलादालन भरविण्यात आले आहे. दोनशेपेक्षा जास्त चित्रांचा समावेश असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर बँकेचे चेअरमन सुभाष गुंदेचा तर यावेळी अभिजीत खोसे, योगेश गलांडे, प्रकाश भागानगरे, आकाश दंडवते, प्रविण नेटके, शिल्पा नेटके, संजीव तनपुरे आदि उपस्थित होते.


आ.संग्राम जगताप म्हणाले की, कल्पनाशक्तींना वाव देण्यासाठी चित्रकला हे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा रंग व पेन्सील दिल्यास त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळणार आहे. या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणार असून, एवढ्या सुरेख पध्दतीने लहान मुलांनी साकारलेल्या कलाविष्काराने प्रभावीत झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सुभाष गुंदेचा म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगातील आजची पिढी हुशार असून, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नेटके अ‍ॅकॅडमीने घेतलेला उपक्रम कौतुकास्पद आहे. नगरमध्ये अनेक कलाकार घडले असून, लहान मुलांमध्ये असलेल्या सुप्त कला गुण ओळखून त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन केल्यास ते भावी आयुष्यात यशस्वी होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हे तीन दिवसीय प्रदर्शन रविवार दि.11 फेब्रुवारी पर्यंन्त नगरकरांना पाहण्यास खुले असून, या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन प्रविण नेटके व शिल्पा नेटके यांनी केले आहे.