Breaking News

मुद्रा बँक योजनेची सर्वंकष माहिती देणारे वेब पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाने विकसित करावे - सुधीर मुनगंटीवार


मुद्रा बँक योजनेची राज्यातील अंमलबजावणी, योजनेतील यशकथांची माहिती देऊन प्रचार आणि प्रसिद्धी करणारे वेब पोर्टल माहिती तंत्रज्ञान विभागाने तत्काळ विकसित करावे, अशी सूचना वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली.
सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या राज्यस्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वित्त व‍ नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर,आमदार अनिल सोले, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुद्रा बँकेचे सहाय्यक महा व्यवस्थापक आदित्य मिश्रा, सीएफटीआरआय चे प्रमुख वैज्ञानिक डॉ. एनजी इबोयैमा सिंह, उद्योजक जयसिंह चव्हाण, ओला कॅब्सचे जी.एस. उप्पल यांच्यासह समिती सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.