Breaking News

सिडको स्नेहसंमेलन कार्यक्रमात जेवणातून 25 जणांना विषबाधा



नवी मुंबई- सिडको स्नेहसंमेेलनाच्या कार्यक्रमातील जेवणातून 25 जणांना काल विषबाधा झाली. सिडको स्नेहसंमेेलनाच्या कार्यक्रमात दुपारी सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना जेवण ठेवण्यात आले होते. या दुपारच्या जेवणातून 25 कर्मचारी अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना विषबाधा झाली. दुधी हलवा खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाल्याचे बोलले जात आहे. साडेसहा हजार जणांनी दुपारचे जेवण घेतले होते. एमजीएम रुग्णालयांत 19 जणांना दाखल करण्यात आले होते, तर अन्य एका रुग्णालयात तीन जणांना दाखल करण्यात आले होते. दोन जणांवर अद्याप उपचार सुरू असून 23 जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती सिडकोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली.