Breaking News

गीतांजली जेम्स कंपनीच्या कर्मचार्‍यांचे आंदोलन


मुंबई : पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी आज गीतांजली जेम्स कंपनीच्या कर्मचार्‍यांनी आंदोलन केले. सक्त वसुली संचालनालयाने मेहुल चोक्सी याच्या गीतांजली जेम्स कं पनीवर कारवाई केली होती. त्यामुळे सर्व कर्मचारी संकटात सापडले आहेत. यावर काहीतरी तोडगा निघावा म्हणून 400 कर्मचार्‍यांनी गीतांजली कार्यालयाबाहेर आंदोलन केले. या कर्मचार्‍यांनी एमआयडीसी आणि सेझच्या प्रशासनाला त्यांच्या थकीत पीएफ आणि ग्रॅच्युईटी संदर्भात पत्र लिहिले आहे.