Breaking News

घुले महाविद्यालयात राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन


भाविनिमगाव / वार्ताहर :- शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील महाविद्यालयात अर्थशास्त्र व वाणिज्य विभागाच्या वतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि. एन. वाबळे यांनी दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात येणार्‍या या चर्चासत्रात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने रिसेंट ट्रेंण्ड इन इंडियन अ‍ॅग्रीकल्चर सेक्टर या विषयावर तर वाणिज्य विभागाच्या वतीने इ-बँकींग बेनिफिटस् अ‍ॅण्ड चॅलेंजेस इन इंडियन इकॉनॉमी या विषयावर दि. 5 व 6 फेब्रुवारी रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही विषय कृषी व ग्रामीण भागाशी निगडीत असल्याने परिसरातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना हे चर्चासत्र फायदेशीर ठरणार आहे. दि 5 फेब्रुवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले व अर्थशास्त्र परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. सुहास आव्हाड आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्राचे उद्घाटन होणार आहे. या दोन दिवसीय चर्चासत्र राज्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आपले विचार संशोधन विषय पेपरच्या माध्यमातून मांडणार आहेत, तरी परिसरातील प्राध्यापक, विद्यार्थी व पालकांना चर्चासत्रास उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डि.एन. वाबळे व समन्वयक प्रा. महेश शेजुळ प्रा.डॉ. राजेंद्र नाबदे यांनी केले आहे.