Breaking News

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात निर्भय कन्या उपक्रम


कर्जत तालुक्यातील खेडच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात निर्भय कन्या उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थीनींना लष्करातील करिअरची ओळख होण्यासाठी लष्करी अधिकारी किरण राऊत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. प्रास्ताविकात डॉ. एन.बी. मुदनुर यांनी महाविद्यालयातील उपक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करीत पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. धर्मेंद्र साळवे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. भारतीय समाज विकास व संशोधन संस्थेचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. प्रा. डॉ. एन. बी. मुदनुर, प्रा. चंद्रकांत मोरे, गिरीश राऊत, प्रा. व्हंडकर, प्रा. शाहूराव पवार, भगवान काळे, रमेश जंजिरे, काशीनाथ सोनवणे, अण्णासाहेब लोखंडे, प्रा. किरण जगताप, अंकुश शेटे आदी उपस्थित होते. लष्करी अधिकारी किरण राऊत यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. लष्करात सामील होण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात करावी लागतात. व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्या. इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करा. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी शुध्द बुद्धी, तंदुरुस्त शरीर आणि भीती मुक्त जीवन जगण्याची धडपड करावी. स्वतःचे दोष स्वतः शोधून आत्मचिंतनातून प्रगती साधावी असे विचार मांडले. तान सहन करण्याची वृत्ती म्हणजे बुद्धी. नवस करणे म्हणजे बुद्धीला गळती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीतून उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली वाघमारे हिने तर दिपाली कायगुडे हिने आभार मानले.