Breaking News

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या युवक तालुकाध्यक्षपदी रोहन आंधळे

भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या युवक पारनेर तालुकाध्यक्षपदी हरेश्‍वर कर्जुले येथील युवा उद्योजक रोहन आंधळे यांची निवड करण्यात आली. तर तालुका कार्याध्यक्षपदी संजय भोर, जिल्हासरचिटणीसपदी हिवरे कोरडा येथील युवा कार्यकर्ते संतोष कोरडे तसेच युवक उपाध्यक्षपदी टाकळी ढोकेश्‍वरचे माजी ग्रामपंचायत सदस्य संजय झावरे व कान्हुर गट प्रमुखपदी जवळा येथील सचिन ईरोळे यांची नुकतीच निवड करण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील यांनी दिली.


संघटनेची जिल्हा बैठक नुकतीच नगर येथे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे, राज्य सचिव किरण वाबळे, प्रदेशउपाध्यक्ष असिफ शेख, जिल्हा उपाध्यक्ष अशोक आंधळे, जिल्हा संघटक राधुजी राऊत यांच्या उपस्थितीत पार पडली. या वेळी नवनियुक्त पदाधिकार्‍यांना संघटनेच्या वतीने उपस्थितांच्या हस्ते नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी युवक तालुकाध्यक्ष रोहन आंधळे बोलताना म्हणाले की, पारनेर तालुक्यात गाव तेथे शाखा स्थापन करण्यासाठी सर्व सहकार्‍यांना बरोबर घेऊन प्रयत्न करणार असुन यापुढे संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे संघटनेचे नेते गणेश चौधरी, तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सचिन सैद, तालुका कार्याध्यक्ष नंदू साळवे, उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर गागरे, अक्षय गवळी, गणेश सुपेकर, भाऊसाहेब वाल्हेकर, चेअरमन संजय भोर, संदिप जाधव, कर्जुले हर्या सोसायटीचे माजी चेरमन संदीप आंधळे, विजय उंडे, चंदु कळमकर, सुनिल मुळे, बाबासाहेब उंडे, सुनिल भंडारी, दिलीप कोकाटे, विकी दाते, ज्ञानेश्‍वर आंधळे, हरी कोकाटे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.