पारनेरला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
आपत़्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणात पावसाळ्यात भरपुर प्रमाणात पाऊस झाला आणि पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तर त्याचा सामना कसा करावयाचा? याचे जवानांनी प्रात्यक्षिक करुन दाखवले. तर दिवसेदिवस वाढत्या लोकसंख्येमुळे पृथ्वीवरिल पर्यावरणाचा -हास होत चालला आहे . त्याचाच परिणाम म्हणुन जमिनीत वेगवेगळे आवाज अनुभवास मिळतात, किवा भुकंप अनुभवास मिळतात. अश्यावेळी प्राथमिक उपाय योजना काय करावी याचे मार्गदर्शन जवानांनी केले. तसेच पारनेर तालुक्यात बहुतांश भाग डोंगराळ आहे. पावसाळ्यात या ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असते. अश्या प्रसंगी प्राथमिक उपाय काय करावे? याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तसेच सध्या वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कुठेना कुठे तरी अपघात दिसुन येतो. अश्यावेळी अपघातातील जखमींना तात्काळ सेवा देणारी पारनेर ग्रामीण रुग्णालयाची 108 सेवा कशी असते. याचे कृती प्रात्यक्षिक डॉ.नरेंन्द्र मुळे यांनी प्रशिक्षणाथॉंना दाखवले. आपत्ती व्यावस्थापनाचे सखोल मार्गदर्शन यावेळी एस.के.सिन्हा यांनी केले.आभार नायब तहसिलदार आर.बी.काथवटे यांनी मानले.
