चांदा /प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील चांदा येथील शिवतेज मित्र मंडळ ट्रस्ट व चांदा ग्रामस्थ यांच्या वतीने चांदा येथील श्रीराम मंदिर सभागृहात शिवजयंती निमित्ताने १८ फेब्रु २०१८ रोजी राज्यस्तरीय खुल्या वत्कृत्व स्पर्धेचे अयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धा समन्वयक संतोष कानडे, देविदास दहातोंडे सह ग्रामस्थांनी केले आहे. स्पर्धेत शिवकालीन महाराष्ट्र व आजची स्थिती, छत्रपती शिवाजी महाराज एक मैंनेजमेंट गुरु, छत्रपती शिवाजी महाराजाचा जातीय सलोखा. शिवरायांची दूरदृष्टी ते गड किल्ले, राष्ट्रमाता जिजाऊच संस्कारशील देश घडवतील. हे विषय ठेवण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक ५०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ३०००/- रु,तृतीय क्र २०००/- रुपये, व चतुर्थ बक्षीस १०००/- रुपयांचे ठेवण्यात आले आहे. उत्तेजनार्थ दोन प्रत्येकी ५००/- रुपये असे बक्षिसांचे स्वरूप असून महिलांसाठी चतुर्थ बक्षीस ठेवण्यात आले आहे. स्पर्धेला येताना ओळख पत्र आणणे आवश्यक आहे. स्पर्धा १८ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता सुरु होतील . त्याच दिवशी पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी अधिक माहितीसाठी संतोष कानडे, देविदास दहातोंडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
शिवजयंती निमित्त चांद्यात वत्कृत्व स्पर्धा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
13:59
Rating: 5