Breaking News

जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई अभियानाचा पुरस्काराने गौरव

पुणे, दि. 20, फेब्रुवारी - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी, सोमनाथ आबा मसुडगे राणजाई प्रकल्प टीम आणि पिंपरी चिंचवड परिसरातील विविध पर्यावरण प्रेमी संघटनांनी मिळून सुरु केलेल्या ’जलपर्णीमुक्त स्वच्छ पवनामाई’ अभियानाचे समाजातील विविध स्तरांमधून कौतुक केले जात आहे. या अभियानाची दखल घेत खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा ’स्वच्छता दूत’ पुरस्कार रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांना देण्यात आला. 


मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त खा. बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात पार पडला. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे अध्यक्ष प्रदीप वाल्हेकर यांना केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते ’स्वच्छता दूत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.