Breaking News

शेअर बाजार पुन्हा कोसळला


मुंबई : अर्थसंकल्प 2018-19 जाहीर झाल्यानंतर सुरु झालेली शेअर बाजारातली पडझड अजुनही सुरूच आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा बाजार 501 अंकांच्या पडझडीसहीत खुला झाला. त्यानंतर परदेशी शेअर बाजारातील पडझडीचा परिणामही भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसला. सकाळी 10.40 च्या सुमारास सेन्सेक्स 476 अंकांच्या पडझडीसहीत 33,937 च्या स्तरावर पोहचला. बिझनेस सेशन दरम्यान सेन्सेक्स 550 अंकांहून अधिक खाली पोहचला. बाजारात झालेल्या या पडझडीमुळे व्यावसायात गुंतवणूकदारांना 2 लाख करोड रुपयांहून अधिक नुकसान झाले. सुरुवातीच्या सत्रात लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅपच्या विक्रीमुळे गुंतवणूकदारांचे 2 लाख करोड रुपयांहून अधिक पैसे बुडाले. गुरुवारी सायंकाळच्या सत्रात शेवटी बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप 1,47,99,096.88 करोड रुपये होता. परंतु, जेव्हा सेन्सेक्समध्ये 550 अंकांची घट नोंदवण्यात आली तेव्हा गुंतवणूकदारांना 2,11,229.88 करोड रुपये बुडाले.