रत्नागिरीत कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम सुरू
रत्नागिरी, दि. 21, फेब्रुवारी - रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयात कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाचे केंद्र सुरू करण्यात आले असून येत्या 12 मार्चपासून नियमित वर्ग सुरू होणार आहेत. या केंद्राचे उद्घाटन इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मकरंद लेले यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय एस. बी. कीर विधी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राजशेखर मलुष्टे यांनी करून दिला.
आयसीएसआय संस्था आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी यांच्यामध्ये कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम चालवण्याविषयी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर स्वाक्षर्या् करुन त्याचे औपचारिक आदान-प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात पुणे विभागाचे सी. एस. इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष ओंकार देवस्थळे यांनी सांगितले की, सध्या भारतात सी.एस.ची संख्या कमी आहे. या काळात व्यवसायाचा जम बसवण्याच्या मोठ्या संधी असतात. रत्नागिरीतील तरुणांनी या क्षेत्रातील व्यवसाय संधींचा लाभ घेण्यासाठी या अभ्यासक्रमाकडे वळावे. संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन म्हणाल्या की, अल्पावधीत आम्ही हे केंद्र सुरू करायला तयार झालो. त्याचा मुलांना चांगला उपयोग होईल. आयसीएसआयचे अध्यक्ष मकरंद लेले म्हणाले, या अभ्यासक्रमाकडे कोकणातील मुले कमी प्रमाणात वळतात. येथील अधिकाधिक मुलांनी या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्यास चांगल्या व्यवसाय संधी उपलब्ध होतील. प्रभारी प्राचार्य राजशेखर मलुष्टे यांनी सांगितले की, या अभ्यासक्रमाचे नियमित वर्ग येत्या 12 मार्चपासून सुरू करण्यात येतील. इच्छुकांनी संबंधितांनी 02352 (221545) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.