Breaking News

बालाजी देडगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


बालाजी देडगाव/प्रतिनिधी/- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे महाशिवरात्री निमित्त येथील महादेव मंदिरात बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी ते बुधवार दिनांक १४ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 
या सोहळ्याचे धर्मध्वजारोहण बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मीराबाई महाराज मिरीकर व शिवभक्त लक्ष्मण लवांडे यांच्या शुभहस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुखदेव महाराज मुंगसे होते. यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच चंद्रकांत मुंगसे, माजी उपसभापती कारभारी चेडे, निवृत्ती मुंगसे, जनाभाऊ तांबे, कुंडलिक कदम, कारभारी मुंगसे, पत्रकार बन्सीभाऊ एडके, रामानंद मुंगसे, नंदकुमार मुथ्था, सतीश मुथ्था, नवनाथ मुंगसे, राजेंद्र कदम, नवनाथ तांबे, लक्ष्मण गोयकर आदी उपस्थित होते. 

सप्ताह काळात सुखदेव महाराज मुंगसे, जगन्नाथ महाराज गवळी, तुकाराम महाराज केसभट, मच्छिंद्र महाराज भोसले , साविताताई दरंदले, रामेश्वर महाराज कंठाळे, गणेश महाराज चौधरी यांची किर्तने तसेच शिवभक्त वै.कनकमल मुथ्था (काका) यांच्या पाचव्या पुण्य स्मरणानिमीत्त प्रवचन होईल. पहाटे ४ ते ५ वाजता काकडा भजन, सकाळी ७ ते ११ वाजता पारायण, दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत प्रवचन, सायंकाळी ५ ते ६वाजता हरिपाठ, रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत हरिकीर्तन व नंतर हरिजागर अशा दैनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.