Breaking News

प्रभात फेरी काढून शौचालय बांधणीचा संदेश


स्वच्छ भारत मिशन अंतर्गत चला गाव हागणदारी मुक्त करू या हे अभियान यशस्वी करण्यासाठी जामखेड तालुक्यातील नान्नज गावच्या जि. प. मराठी व ऊर्दू शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या वतीने गाव भर फेरी काढून घरोघरी शौचालय बांधण्याचा संदेश देण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण गावासह राज्यभर स्वच्छता व आरोग्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात जिल्हा स्तरापासून ग्रामीण भागातील वाडीवस्तीपर्यंत विशेष जागृती केली जात आहे. शंभर टक्के राज्य हागणदारी मुक्त करण्याचा संकल्प व आटोकाट प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरातून गावातील प्रत्येक कुटुंबाला शौचालयाची माहिती सांगून शौचालय बांधण्यास शासनाचे अनुदान दिले जात आहे. शासनाने दिलेल्या उदीष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आपला गाव स्वच्छ करून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच जामखेड तालुक्यातील नान्नज या 13 ग्रा. सदस्यांच्या वतीने गाव पातळीवर शौचालयाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी गावच्या संरपच सौ विद्याताई सर्जेराव मोहळकर, उपसरपंच तुळशिराम मोहळकर, ग्रामविकास अधिकारी रोहीदास कापरे व सर्व सदस्यांच्या वतीने उत्कृष्ट काम सुरू असून गाव पुर्ण हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत असून नागरिकही त्यास आपला उत्तम प्रतिसाद देत आहे. तरीही शेवटच्या टप्प्यातील अपुरे राहिलेले काही शौचालय पुर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी आज गावातील शालेय चिमुकल्या मुलांसह अंगणवाडी सेविका, शिक्षक, संरपच मोहळकर, ग्रामविकास अधिकारी कापरे आदींसह नान्नज गावात फेरी काढून घोषणा देऊन शौचालयासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले.