Breaking News

शिवछत्रपतींच्या कार्याचा आदर्श घ्या - हभप गिरी


महाराष्ट्रातील तमाम तरूणांनी छ. शिवाजी महारांचा आदर्श अंगी बाळगून जीवन घडवून संत संगती करावी. हभप महादेव गिरी महाराज गुंफा येथील श्री क्षेत्र स्वयंभू काळेश्‍वर देवालय येथे महाशिवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या सप्ताहाचे कीर्तणरूपी तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी मातापित्यांची सेवा करा, देशाची सेवा करा, व्यसन मुक्त रहा, धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होण्याचे संदेश दिले. कार्यक्रमासाठी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, यांनी आपली उपस्थिती दर्शविली. यावेळी त्यांचा सन्मान करण्यात आला.