Breaking News

देवटाकळी सरपंच पदासाठी 6 अर्ज दाखल, 9 सदस्य जागेसाठी विक्रमी 34 अर्ज दाखल


शेवगाव तालुक्यातील देवटाकळी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम तांत्रिक अडचणींमुळे बदलला असल्याने इच्छूकांना सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. शनिवारी सहाव्या दिवशी सरपंच पदासाठी 2 तर सदस्यपदासाठी तिनही प्रभागात एकोणावीस उमेदवारानी अर्ज दाखल केले आहे. आतापर्यंत सरपंच पदासाठी 6 तर सदस्यपदासाठी 34 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वाल्मिक सुडके यांनी दिली. देवटाकळी (ता.शेवगाव) येथील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरु झाले सुरूवातीस सरपंच पदासह सदस्यपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. पाचव्या दिवशी सरपंच पदासाठी निकीता ज्ञानदेव खरड, सुमैया शेख, शबाना शेख व सविता खरड हे चार उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. काल शनिवारी सविता संदीप खरड, रेखा देवेंद्र मेरड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तर सदस्यपदासाठी शुक्रवारी 15 अर्ज दाखल झाले होते. काल शनिवारी सदस्यपदासाठी 19 अर्ज दाखल झाले आहे.