Breaking News

लंडनमधील डॉ. आंबेडकर स्मारकास आ. थोरातांची भेट

संगमनेर प्रतिनिधी ;- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये वास्तव्य केलेल्या आणि भारतियांसाठी ऐतिहासिक वारसा ठरलेल्या निवासस्थानास राज्याचे नेते, आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रकृल शिष्टमंडळाने भेट दिली. लंडनमधील १० या निवासस्थानास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील फोटो प्रदर्शन ही लावण्यात आलेले आहे.

या निवासस्थानातील वास्तव्यादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून ‘बार अ‍ॅट लॉ’ ही पदवी संपादन केली. विविध विषयांवर संशोधनही त्यांनी केले होते. या वास्तूशी डॉ. आंबेडकर यांच्या अनेक आठवणी जुळल्या आहेत. हे निवासस्थान आंतरराष्ट्रीय स्मारक म्हणून सन्मानित झालेले आहे.

यावेळी आ. थोरात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्‍वरत्न आहे. अफाट बुध्दीमत्ता असलेल्या या व्यक्तिमत्वाने भारतीय राज्यघटना व समृध्द लोकशाही ही मोठी देण जगाला दिली. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडीत नेहरु यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा प्रभाव आहे. इंग्लडमधील आंबेडकरांचे स्मारक हे भारतियांसाठी स्फूर्तिस्थान आहे. या स्मारकास भेट देवून मोठा आनंद झाला.