Breaking News

इज्तेमा - एक दृष्टीक्षेप

कानफाट्या म्हणून एखाद्या विशिष्ट समाजाची सातत्याने हेटाळणी करून बदनाम करण्याचा विडा काही मंडळींनी उचलला आहे. माञ उसूल शुध्द असेल तर एक ना एक दिवस हेटाळणी अन् बदनामी करणार्या तोंडांना मुसक्या बांधण्याचे धैर्य निर्माण होते.टिकाकारांच्या नाकाला वेसण टोचता येते.एक नाही दोन नाही तर तब्बल सत्तर लाखांचा समुदाय ज्यात सर्व पंथीय सहभागी होऊन एकञ येतो, दोन दिवस एकत्र राहून वतन, अमन, खिदमत, मदत या मानवी मुल्यांवर मंथन करून त्या मुल्यांच्या जतन संवर्धनाची शिदोरी घेऊन आपआपल्या घरांकडे आल्या मार्गाने तितक्याच शांततेत परततो तेंव्हा जगाच्या पाठीवर बदनाम केला जात असलेला हाच तो मुस्लीम समाज का? असा बुचकाळ्यात टाकणारा प्रश्‍न समोर उभा राहतो. औरंगाबाद मध्ये गेले दोन दिवस जगभरातून एका मैदानावर एकत्र आलेल्या जवळपास पाऊण कोटी मुस्लिम बांधवांनी दाखवलेला शिस्तीचा आदर्श अवघ्या जगाला आश्‍चर्याने तोंडात बोट घालण्यास कारणीभूत ठरला आहे.विशेष म्हणजे या ठिकाणी इस्लाम कबूल असूनही काही चाली रिती आणि परंपरा वेगळ्या म्हणून मतभेद असलेल्या अनेक पंथांच्या अनुयायांनीही आपसातील सारे मतभेद विसरून या न भुतो अशा इज्तेमाला हजेरी लावली. गेल्या वर्षी लाखोंच्या संख्येने मराठा बहूजन समाज आपल्या सर्व जात कु ळांच्या सिमा ओलांडून संघटीतपणे रस्त्यावर आला होता.त्यानंतर औरंगाबादमध्ये काल परवा एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी एकञ येऊन शिस्तीचा आगळा आदर्श जगासमोर ठेवला. लोक समुदायाचे नियोजन कसे असावे, विशेषतः मराठा समाजाने गर्दीचे मानसशास्त्र ज्या कुशलतेने हाताळले त्याच कौशल्याची प्रचिती सत्तर लाखाच्या नियोजनात प्रत्येक टप्यावर जाणवली. कशासाठी जमला होता हा समुदाय? कुणाचे होते हे आयोजन नियोजन ? काय मंथन झाले या गर्दीत ?आणि काय नेले या मंडळींनी या मंथनातून? या प्रश्‍नांची सविस्तर उत्तरे तपशीलवार उद्याच्या अंकात.